पुणे : हातउसने दिलेले पैसे परत न दिल्याने महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिलीप मरळ (रा. वारजे) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मरळ आणि तक्रारदार महिला ओळखीचे आहेत. मरळने महिलेला काही महिन्यांपूर्वी हातउसने पैसे दिले होते. महिलेने पैसे परत केले नव्हते. त्यामुळे मरळने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. महिलेचा विनयभंग करुन तिची बदनामी केली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-05-2022 at 15:49 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman molested for not returning money pune pune print news zws