Badishep Sarbat Recipe : उन्हाळ्याच्या दिवसांत भर उन्हातून घरी आलो की आपल्याला काहीतरी गारेगार प्यावेसे वाटते. अशावेळी आपण आवर्जून कसलं ना कसलं सरबत करतो. यामध्ये प्रामुख्याने लिंबू, कोकम नाहीतर आवळा यांचा समावेश असतो. एरवी आपण कोणी पाहुणे आले की अगदी सहज चहा किंवा कॉफी विचारतो. पण उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र आल्या गेलेल्यांनाही शरीराला थंडावा देणारं सरबत दिलं जातं. या सरबतामध्ये नेहमीपेक्षा थोडं वेगळं ट्राय करायचं असेल आणि शरीराला थंडावा द्यायचा असेल तर बडीशेपचे सरबत हा उत्तम पर्याय ठरु शकतो. अगदी ५ मिनीटांत हे गारेगार सरबत तयार होते. पाहूयात या सरबताची सोपी रेसिपी

बडीशेप सरबत साहित्य –

१. २ चमचे लिंबू, १/२ वाटी बडीशेप

२. ३ ते ४ पुदिन्याची पाने

३. चवीनुसार साखर

४. चवीनुसार काळे मीठ

बडीशेप सरबत रेसिपी

१. बडीशेप सिरप बनवण्यासाठी सर्वप्रथम बडीशेप धुवून घ्या. नंतर दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवा.

२. दोन ते तीन तासांनंतर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यावे.उरलेले साहित्य एकत्र करून घ्या. बारीक पावडर बनवा.आता एका ग्लासमध्ये पाणी काढून त्यात ही पेस्ट घाला.

३. वरून लिंबाचा रस घाला. समर हेल्दी ड्रिंक बडीशेप सिरप तयार आहे.

४. आता त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि तुमचा चविष्ट शरबत तयार आहे.

५. बडीशेपचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे ते पिल्याने शरीर थंड राहते.

हेही वाचा >> Bitter Guard Recipe: कडू कारल्याची आबंट- गोड भाजी, मुलंही आवडीने खातील

बडीशेपमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक असतात. हे पिल्याने डिहायड्रेशनची समस्याही टाळता येते.