Date Pickles: लोणचे म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. आपल्याकडे प्रामुख्याने कैरी आणि लिंबाचे लोणचे मोठ्या प्रमाणात बनवले जाते. पण, हळूहळू महिला विविध प्रकारची लोणची बनवताना दिसतात. ज्यात मिरची, करवंद, गाजर यांसारख्या लोणच्यांचा समावेश असतो; त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खजुराचे लोणचे कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

खजुर लोणचे बनवण्याचे साहित्य :

१. ३०० ग्रॅम खजूर
२. १ चमचा लाल मिरची पावडर
३. १ कप लिंबाचा रस
४. ३ चमचे धणे पावडर
. ३ चमचे बडीशेप पावडर
६. ३ चमचे जिरे पावडर
७. मीठ चवीप्रमाणे

खजुर लोणचे बनवण्याची कृती :

हेही वाचा: मुलांसाठी खास असा बनवा पौष्टिक आणि चवदार मटार उत्तपा; नोट करा साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी खजुराचे लोणचे बनवण्यासाठी गॅसवर मंद आचेवर एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा.

२. त्यानंतर पाणी गरम झाल्यावर त्यात खजूर टाकून ते उकळून घ्या. जेव्हा खजूर नरम होतील तेव्हा त्याच्या बिया काढून टाका.

३. आता एका वाटीत खजूर, लाल मिरची पावडर, बडीशेप पावडर, जिरे पावडर एकत्र करून घ्या आणि एका बरणीमध्ये भरून व्यवस्थित भरून ठेवा.

४. त्यानंतर एका वाटीत लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून ठेवा, काही वेळाने ते खजुराच्या मिश्रणावर टाकावे.

५. पण यात खजूर जेवढे भिजेल, तेवढाच लिंबाचा रस घ्यावा.

६. अशा पद्धतीने खजूर लोणचे तयार होईल.

७. हे तयार लोणचे काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत ठेवा.

८. त्यानंतर लोणच्याच्या बरणीला ७-८ दिवसांपर्यंत थोडे-थोडे हलवत राहा, ज्यामुळे लोणचे चांगले एकजीव होईल.

९. एका आठवड्यानंतर खजूर लोणचे खाण्यासाठी तयार होईल, याला जेवणासोबत सर्व्ह करा.