Laddu Recipe: उपवास म्हटलं की, अनेकजण सतत फराळाव्यतिरिक्त वेफर्स, फळं, ड्राय फ्रुट्स सतत खात असतात. पण अनेकदा तेच तेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही उपवासाचे लाडू आवर्जून बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपवासाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ४ वाटी शेंगदाणे
  • १ वाटी सफेद तीळ
  • १ वाटी गूळ
  • १ वाटी काजू-बदाम

उपवासाचे लाडू बनवण्याची कृती:

हेही वाचा: श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी गव्हाच्या पंजिरीची सोपी रेसिपी; पटकन नोट करा साहित्य, कृती..

  • सर्वप्रथम मोठ्या गरम कढईत शेंगदाणे भाजून घ्या आणि ते एका ताटात काढून घ्या.
  • त्यानंतर तीळ भाजून घ्या आणि गूळ बारीक करुन घ्या.
  • आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, तीळ, गूळ, काजू, बदाम वाटून घ्या.
  • हे मिश्रण एका मोठ्या ताटात काढून त्याचे लाडू वळून घ्या.
  • तयार चविष्ट आणि पौष्टिक लाडू उपसाच्या दिवशी आवर्जून बनवून खा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not only for fasting but also for health these laddus are very nutritious sap