Potato Thecha : रोज काय भाजी करावी असा प्रश्न गृहिनींना नेहमी सतावतो. अशा वेळी सर्वात सोपा पर्याट असतो तो म्हणजे बटाटा. बटाट्याची विविध प्रकारच्या भाज्या तयार करता येतात आणि कोणत्याही पद्धतीने बटाट्याची भाजी केली तरी सर्वांना हमखास आवडते, कारण बटाटा हा जवळपास सर्वांचा आवडता पदार्थ आहे तुम्हाला बटाटा आवडतो का? तुम्ही बटाट्याचे काचरे, बटाट्याचा रस्सा, पिवळ्या बटाट्याची भाजी, बटाटा पराठा असे कित्येक पदार्थ आपण आवडीने खातो पण तुम्ही कधी बटाट्याचा ठेचा खाल्ला आहे का? नसेल तर ही रेसिपी नक्की खाऊन पाहा. तसेच तुम्हाला मिर्चीचा ठेचा आवडत असेल तर ही रेसिपी देखील तुम्हाला नक्की आवडेल. झणझणीत मिर्चीच्या ठेच्याची चव जेव्हा बटाट्याबरोबर एकत्र होते तेव्हा त्याची चव आणखी वाढते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झणझणीत आणि झटपट तयार होणारा बटाट्याचा ठेचा

घाईच्यावेळी झटपट तयार होईल असा हा ठेचा तयार करणे अगदी सोपे आहे. त्याच चवही रुचकर आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ नक्की आवडेल. मग वाट कसली पाहात आहात नोट करा रेसिपी

बटाट्याचा ठेचा रेसिपी

बटाट्याचा ठेचा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • बटाटे – २
  • मिरच्या- – ७-८
  • शेंगदाणे – अर्धा कप
  • लसून – ७-८ पाकळ्या
  • जिरे – आवश्यकतेनुसार
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • मीठ – आवश्यकतेनुसार
  • कडीपत्ता – आवश्यकतेनुसार
  • चिरलेली कोथिंबीर – आवश्यकतेनुसार

हेही वाचा – लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट वाटली डाळ! लिहून घ्या रेसिपी

बटाट्याचा ठेचा तयार करण्याची कृती

  • प्रथम एका पॅनमध्ये तेल टाका त्यात मिरच्या लसून आणि शेंगदाणे टाका.
  • आता त्यात बटाटा टाकून चांगले परतून घ्या. त्यावर झाकण ठेूवून एकदा वाफ येऊ द्या.
  • मग थोड्या वेळाने एका प्लेटमध्ये सर्व मिश्रण काढून घ्या. हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून चांगले बारीक करा.
  • आता पुन्हा एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाका आणि हिंग टाका त्यात वाटलेले मिश्रण टाका पुन्हा व्यवस्थित परतून घ्या .
  • सर्व मिश्रण एकजीव करा. त्यात चिरलेली कोथिंबीर टाका. तुमचा बटाट्याचा ठेचा तयार आहे.

हेही वाचा – खान्देशी पध्दतीचं झणझणीत चवदार कोंबडी बेसन; झक्कास होईल बेत

हेही वाचा – पोहे अन् कच्चा बटाटा वापरून झटपट बनवा खमंग खरपूस नाश्ता, दही आणि लोणच्याबरोबर खा चविष्ट पराठा

झटपट तयार होणारा झणझणीत बटाटा ठेचा तुम्ही चपातीबरोबर किंवा डाळ-बाताबरोबर खाऊ शकता. इंस्टाग्रामवर diplakshmi123 नावाच्या पेजवर ही रेसिपी शेअर केली आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spicy potato thecha recipe try it once and write down the recipe quickly snk