३० ऑगस्टपासून ‘या’ राशींचा वाईट काळ सुरू! खर्चात खर्च, आर्थिक तंगी तर तब्येतही बिघडू शकते
Budh Gochar on 30 August: ग्रहांचा राजकुमार बुध ३० ऑगस्टला संध्याकाळी ४:४८ वाजता राशी बदलणार आहे. बुध ग्रहांचा राजा सूर्याच्या घरात म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करेल. त्यामुळे ८ राशींच्या लोकांच्या जीवनावर याचा परिणाम होणार आहे. या लोकांना ३० ऑगस्टपासून १५ सप्टेंबर सकाळी ११:१० वाजेपर्यंत फायद्यापेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागेल. त्यांच्या करिअर, आरोग्य आणि नातेसंबंधांवर याचा परिणाम दिसू शकतो. चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीत बुध गोचराचा वाईट प्रभाव काय असेल.