१९ सप्टेंबरपासून बुध-यमाचा राजयोग ‘या’ ३ राशींना देणार नुसता पैसा! अचानक आर्थिक लाभ
Budh Yam Yuti: वैदिक ज्योतिषानुसार बुध हा नवग्रहांमध्ये खास ग्रह मानला जातो. त्याला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. बुध हा बुद्धी, विचारशक्ती, तर्क, मान-सन्मान यांचा कारक आहे. त्यामुळे बुधाच्या स्थितीत बदल झाल्यास त्याचा परिणाम १२ राशींवर काही ना काही प्रकारे होतो. बुध साधारणपणे एका महिन्यात २ वेळा राशी बदलतो.
सध्या बुध आपल्या स्वतःच्या कन्या राशीत आहे. या राशीत असताना बुधाची इतर ग्रहांसोबत युती होते. आता बुध आणि यम यांच्या संयोगाने नवपंचम राजयोग तयार होणार आहे.