Chanakya Niti : आयुष्यात चुकूनही तुमच्या ‘या’ ४ गोष्टी कोणाबरोबरही करू नका शेअर
Chanakya Niti For Life : प्रत्येकाला आयुष्यात विविध संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत योग्य विचारसरणी असणे आणि योग्य रणनीती अवलंबणे खूप महत्त्वाचे आहे. कारण- हाच संकटाचा काळ तुम्हाला कोण तुमचं आणि कोण परकं हे दाखवून देतो. दरम्यान आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि राजकीय कौशल्यासाठी ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या संकटाच्या वेळी तुमचे रक्षण करू शकतात.