फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’चा टीझर समोर, मेजर शैतान सिंह यांच्या वीरगाथा रुपेरी पडद्यावर
फरहान अख्तरच्या मुख्य भूमिकेत असलेला ‘१२० बहादूर’ या युद्धपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. फरहान १९६२ च्या ‘रेझांग ला’च्या युद्धातील परमवीर चक्र विजेता मेजर शैतान सिंह यांची भूमिका साकारत आहे. टीझरमध्ये युद्धाचे भावनिक चित्रण आणि प्रभावी संवाद आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केले असून, निर्माते रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि अमित चंद्रा आहेत. चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.