आमिर खानने इच्छा नसतानाही ‘या’ चित्रपटात केलेलं काम
प्रसिद्ध अभिनेता आमिर खानने 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त केले. त्याने सांगितले की, त्याला हा चित्रपट आवडला नव्हता आणि प्रेक्षकांनाही तो आवडणार नाही याची त्याला पूर्वकल्पना होती. चित्रपटात अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यांसारखे कलाकार असूनही, चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही. आमिरने चित्रपटाच्या अपयशाची जबाबदारी घेतली.