“गे मुलाने गैतवर्तन..”, ‘बिग बॉस’फेम अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
'बिग बॉस'च्या १७ व्या पर्वात झळकलेल्या अभिषेक कुमारने त्याला आलेल्या कास्टिंग काऊचच्या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. मुंबईत नवीन असताना एका व्यक्तीने त्याच्याबरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अभिषेकला खूप त्रास झाला होता. आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्याच्या आईने त्याला घरी येण्याचा सल्ला दिला. अभिषेक 'बिग बॉस'च्या १७ व्या सीझनचा उपविजेता ठरला होता.