१२ वर्षांपासून बॉलीवूड अभिनेत्यासह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री
अभिनेत्री आणि मॉडल मुग्धा गोडसेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने बॉलीवूड अभिनेता राहुल देवसोबरोबरच्या रिलेशनशिपला १२ वर्षे पूर्ण झाल्याने हा फोटो पोस्ट करत '१२ वर्षे' असं कॅप्शन दिलं आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल देव यांचं पूर्वी रीना देवसोबत लग्न झालं होतं, परंतु त्यांच्या निधनानंतर राहुल आणि मुग्धा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मुग्धाने 'फॅशन' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.