आलिया भट्टच्या नावात बदल? अभिनेत्रीने नावामागे जोडलं नवऱ्याचं आडनाव
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पदार्पण केलं आहे. नुकतच अभिनेत्रीने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने रेड कार्पेटसाठी तयारी करताना ती मज्जा करताना मज्ज करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, व्हिडीओमध्ये आलियाच्या नावामागे 'आलिया कपूर' असं लिहिलेलं दिसतं, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. आलियाने रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर तिचं आडनाव बदलल्याचं म्हटलं जात आहे.