अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचं निधन
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते चंद्रा बारोट यांचं ८६ व्या वर्षी निधन झालं. फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 'डॉन' चित्रपटातून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं, ज्यात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. 'डॉन'ने त्यांना यश मिळवून दिलं, पण नंतरच्या चित्रपटांना तितकं यश मिळालं नाही. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.