“हे काम करणारं सरकार…”, ‘ऑपरेशन महादेव’च्या यशाबद्दल अनुपम खेर यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आणि तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. या यशाबद्दल अभिनेते अनुपम खेर यांनी सरकार आणि सैन्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी 'ऑपरेशन महादेव'ची गरज आणि यशस्वीतेबद्दल अभिमान व्यक्त केला.