“हल्ली बायका नवऱ्यासाठी घातक ठरत आहेत”, अनुपम खेर यांचं वक्तव्य; म्हणाले…
गेल्या काही महिन्यांत विवाहबाह्य संबंधांमुळे पतीच्या हत्येच्या घटना वाढल्या आहेत. गीतकार जावेद अख्तर यांच्यानंतर अनुपम खेर यांनीही या बदलत्या नातेसंबंधांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ही समस्या फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. अनुपम खेर सध्या त्यांच्या 'तन्वी - द ग्रेट' चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यग्र आहेत. हा चित्रपट 'स्पेशल चाईल्ड'वर आधारित असून १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.