अनुराग कश्यपने ‘निशांची’साठी ऐश्वर्य ठाकरेची ‘अशी’ केली निवड, म्हणाला, “ठाकरे आडनावामुळे…”
दिग्दर्शक अनुराग कश्यप लवकरच 'निशांची' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणत आहे. यात बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे मुख्य भूमिकेत आहे. अनुरागने सांगितले की, ऐश्वर्यला ही भूमिका त्याच्या अभिनयकौशल्यामुळे मिळाली आहे. चित्रपटात ऐश्वर्यची दुहेरी भूमिका आहे, ज्यासाठी त्याने शारीरिक बदल केले. मोनिका पवार, मोहम्मद झीशान अयूब व कुमुद मिश्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. १९ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.