शाहिद कपूरचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट रद्द, दिग्दर्शकाने दिली माहिती; म्हणाले…
छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शाहिद कपूरच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट सध्या थांबवण्यात आला आहे. दिग्दर्शक अमित राय यांनी या निर्णयाचं नेमकं कारण सांगितलं नाही, परंतु त्यांनी इंडस्ट्रीतील समस्यांवर नाराजी व्यक्त केली. राय यांनी शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची कथा स्वतः लिहिली होती, पण ती पुढे नेण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे शाहिद कपूरला या भूमिकेत पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहणार आहे.