सुनील शेट्टी यांची उच्च न्यायालयात धाव; फोटोंचा गैरवापर केल्याबद्दल कारवाईची मागणी
बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनी त्यांच्या फोटो-व्हिडीओंचा परवानगीशिवाय चुकीच्या पद्धतीनं वापर केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही वेबसाईट्स आणि सोशल मीडिया पेजेस त्यांच्या फोटोचा व्यावसायिक उद्दिष्टांसाठी वापर करत आहेत. सुनील शेट्टी यांनी अशा सर्व वेबसाइट्सना फोटो-व्हिडीओ काढून टाकण्याचे आणि भविष्यात चुकीचा वापर न करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे.