“भरपूर पैसे वाटले, पण…” अनंत अंबानीने लग्नात २ कोटींचे घड्याळ न दिल्याने गायक नाराज
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं राधिका मर्चंटशी जुलै २०२४ मध्ये लग्न झालं. या लग्नात बॉलीवूडचे अनेक स्टार्स उपस्थित होते. अंबानींनी अनंतच्या मित्रांना आणि काही निवडकांना दोन कोटींची घड्याळं भेट दिली. मिका सिंगने या लग्नात परफॉर्म केलं, त्याला भरपूर मानधन मिळालं, पण महागडं घड्याळ न मिळाल्याने तो नाराज आहे. मिकाने सांगितलं की त्याला मिळालेल्या पैशांत तो पाच वर्षे आरामात जगू शकतो.