“मी काश्मीरमध्ये २ वर्ष…”, दिशा पाटनीच्या बहिणीचा संताप; भारतीय सैन्यात बजावलीय सेवा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केल्यानंतर देशभरात संताप उसळला आहे. माजी लष्करी अधिकारी व दिशा पाटनीची बहीण खुशबू पटानी यांनी सोशल मीडियावर राग व्यक्त केला आहे. त्यांनी पाकिस्तानविरोधात युद्धाची मागणी केली आहे. खुशबू म्हणाल्या की, हे दहशतवादी नसून पाकिस्तानी सैन्य आहे. त्यांनी भारतीय सैन्याला आदेश देऊन कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.