“१०० कोटी दिले तरी काम करणार नाही”, संगीत दिग्दर्शकाच संजय लीला भन्साळींवर टीकास्त्र
संजय लीला भन्साळी आणि इस्माईल दरबार यांची जोडी एकेकाळी संगीत क्षेत्रात प्रसिद्ध होती. 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' या चित्रपटांसाठी दरबार यांनी संगीत दिलं होतं. मात्र, नंतर दोघांमध्ये वाद झाले. दरबार यांनी भन्साळींना गर्विष्ठ म्हटलं आणि १०० कोटी रुपये दिले तरी त्यांच्यासोबत काम करणार नाही असं सांगितलं. 'गुजारिश'साठीही दोघे एकत्र आले नाहीत.