रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये काम करण्यास ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याचा नकार
लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर सध्या 'रामायण' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. जयदीप अहलावतला बिभीषणाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती, परंतु तारखा जुळत नसल्यामुळे त्याने नकार दिला. 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता, सनी देओल हनुमान, यश रावण, आणि आदिनाथ कोठारे भरताच्या भूमिकेत दिसणार आहेत. जयदीप सध्या विविध वेब सीरिज आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.