कुनिका सदानंद आणि मीनाक्षी शेषाद्रींबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर कुमार सानूंनी दिलं उत्तर
बॉलीवूड गायक कुमार सानू यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक वाद आणि अफवा चर्चेत आहेत. 'बिग बॉस १९'मध्ये अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी त्यांच्याबरोबरच्या लिव्ह-इन रिलेशनशिपचा उल्लेख केला. कुमार सानू यांचे पहिले लग्न रीटा भट्टाचार्य यांच्याशी झाले होते, पण घटस्फोटानंतर मीनाक्षी शेषाद्री यांच्याशी अफेअरच्या अफवा पसरल्या. मात्र, कुमार सानू यांनी या सर्व आरोपांना खोटं ठरवलं आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नी सलोनी भट्टाचार्य यांच्याशी २३ वर्षांचं सुखी वैवाहिक जीवन आहे.