Mahavatar Narsimha ची बॉक्स ऑफिसवरील गर्जना कायम, एकूण कमाई तब्बल…
अश्विन कुमार दिग्दर्शित ‘महावतार नरसिम्हा’ या पौराणिक ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या ५ आठवड्यांनंतरही या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने २३८.२५ कोटी कमावले आहेत. ‘महावतार नरसिम्हा’ने ‘कोचडैयन’चा विक्रम मोडला असून, डिस्नी, सोनी आणि मार्व्हलच्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. लहान मुलं आणि कौटुंबिक मनोरंजनासाठी हा चित्रपट लोकप्रिय ठरला आहे.