शाहरुख-अमिताभ नव्हे तर, रणबीर-आलियाचं नवीन घर आहे मुंबईतलं सर्वात महागडं घर
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं नवं घर मुंबईतील सर्वात महागडं सेलिब्रिटी घर ठरलं आहे. हे घर बांद्रामध्ये, राज कपूर यांच्या 'कृष्णा राज' बंगल्याच्या जागी उभं केलं आहे. या घरासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च आला आहे. यामुळे शाहरुख खानचं 'मन्नत' आणि अमिताभ बच्चन यांचं 'जलसा' मागे पडलं आहे. भारतातील सर्वात महागडं सेलिब्रिटी घर सैफ अली खानचं पटौडी पॅलेस आहे.