नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ची घोषणा, ‘या’ दिवशी येणार सिनेमा
राणी मुखर्जी लवकरच 'मर्दानी ३'मधून पोलिस अधिकारी शिवानी रॉयच्या भूमिकेत परतणार आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तो प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे, ज्यात राणी मुखर्जी बंदूक घेऊन खंबीरपणे उभी आहे. प्रेक्षकांनी या घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.