गोविंदाच्या उशिरा येण्यामुळे संतापलेला संजय दत्त, रागात शिवीगाळ केलेली अन्…
नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता गोविंदा आपल्या हटके डान्स स्टाईल आणि अभिनयामुळे प्रसिद्ध झाला. मात्र, त्याच्या वेळ न पाळण्याच्या सवयीमुळे अनेक किस्से गाजले. 'जोड़ी नं. १'च्या सेटवर गोविंदामुळे संजय दत्तला ९ तास वाट बघावी लागली होती. त्यामुळे संजय दत्त खूप चिडला आणि सीन बदलायला लावला. शेवटी गोविंदा दुपारी ३ वाजता सेटवर पोहोचला आणि सीन दोन तासांत पूर्ण केला.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 