शाहरुख खानला हरित लवादाचा दिलासा; अखेर नूतनीकरणाची ‘मन्नत’ पूर्ण
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याचे नूतनीकरण सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नूतनीकरणात उल्लंघनाचा दावा केला होता, परंतु राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) हा दावा फेटाळला. नूतनीकरणानंतर मन्नत बंगल्यात दोन बेसमेंट, एक ग्राउंड फ्लोअर आणि सातवा-आठवा मजला असेल. सध्या खान कुटुंब बांद्र्यातील पाली हिल परिसरात भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे.