दीपिका कक्करवर झाली शस्त्रक्रिया, पती शोएब इब्राहिमने दिली माहिती
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज २ लिव्हर कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. तिने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली होती. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून, ती १४ तास ओटीमध्ये होती. तिचा नवरा शोएब इब्राहिमने सांगितलं की, शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून दीपिका सध्या आयसीयूमध्ये आहे. तिची तब्येत सुधारत आहे आणि ती लवकरच बरी होईल, अशी आशा आहे.