अक्षय कुमारच्या आगामी सिनेमात झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; चित्रीकरणाला सुरुवात
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने 'हैवान' या आगामी थ्रिलर चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार व सैफ अली खान १८ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकरही या चित्रपटात झळकणार आहे. 'हैवान' हा मल्याळी चित्रपट 'Oppam' चा रिमेक आहे. श्रिया पिळगावकरने 'फॅन' चित्रपटातून पदार्पण केले असून, वेब सीरिजमधील तिच्या कामामुळे ती चर्चेत आहे.