JioHotstar वर येतायत ‘हे’ भन्नाट फीचर्स; ना डबिंगची गरज, ना शोधाशोध, अंबानींची घोषणा!
JioHotstar ने अल्पावधीतच मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. रिलायन्सच्या AGM 2025 मध्ये आकाश अंबानी यांनी JioHotstar अॅपमध्ये येणाऱ्या नवीन फीचर्सची घोषणा केली. यात RIYA व्हॉईस कमांड सर्च असिस्टंट, Voice Print AI Voice Cloning आणि MaxView 3.0 यांचा समावेश आहे. हे फीचर्स लवकरच उपलब्ध होतील, परंतु यासाठी अतिरिक्त शुल्क लागेल का याबाबत अद्याप माहिती नाही.