GST 2.0 मुळे ऑटो कंपन्या भरधाव, शेअर बाजारात विक्रमी उंची; ‘या’ कंपन्यांचा सर्वाधिक फायदा!
२२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या नव्या जीएसटी स्लॅबमुळे काही क्षेत्रांना फायदा झाला आहे. ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले असून, मारूती सुझुकी, आयशर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज ऑटो यांना सर्वाधिक फायदा झाला आहे. नुवामा इन्स्टिट्युशनल इक्विटिजनं या कंपन्यांना टॉप फेव्हरेट म्हटलं आहे. १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटीमुळे कार, बाईक आणि घरगुती वस्तू स्वस्त झाल्या आहेत, ज्यामुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळणार आहे.