AI मुळे खरंच नोकऱ्या जातील का? Nvidia च्या सीईओंचं महत्त्वाचं विधान
Nvidia चे सीईओ जेन्सन ह्युआंग यांनी एआयच्या भविष्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, एआयमुळे नोकऱ्या जाण्याऐवजी नव्या नोकऱ्या निर्माण होतील. त्यांनी सांगितले की, एआयमुळे प्रत्येकजण प्रोग्रॅमर, कलाकार आणि लेखक होऊ शकतो. पुढील पाच वर्षांत एआय इंटरनेटपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण करेल, असेही त्यांनी भाकित केले. भविष्यात प्रत्येक कंपनी दोन शाखांद्वारे काम करेल, एक प्रत्यक्ष उत्पादन करणारी आणि दुसरी ऑनलाईन स्वरूपात काम करणारी.