Repo Rate Impact on Home Loan: रेपो रेट म्हणजे काय? त्याचा कर्जाच्या व्याजदराशी काय संबंध?
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पत धोरणात रेपो रेटमध्ये बदल केल्यास गृह आणि वाहन कर्जांच्या व्याज दरांवर परिणाम होतो. रेपो रेट वाढल्यास बँका कर्जाच्या व्याज दरात वाढ करतात, तर कमी झाल्यास व्याज दर कमी करतात. यामुळे कर्जाच्या हप्त्यांमध्ये बदल न होता परतफेडीचा कालावधी वाढतो किंवा कमी होतो. सध्या बँकांचे व्याज दर रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) पद्धतीचे असतात.