नरेंद्र मोदी यांना २००५ साली मिळाला होता, सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री राजीव गांधी पुरस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय मतभेद असूनही, २००५ साली राजीव गांधी फाऊंडेशनने त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून गौरविले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी उद्योगपूरक वातावरण निर्माण केले होते, ज्यामुळे महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला स्थलांतरित झाले. या घटनांमुळे महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चौकशीचे आदेशही दिले होते.