Amazon भारतातही कर्मचारी कपात करणार, १००० कर्मचाऱ्यांना सोडावी लागणार नोकरी!
गेल्या काही महिन्यांपासून एआयमुळे नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा सुरू आहे. अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. अॅमेझॉननेही ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली असून, त्यात भारतातील ८०० ते १००० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कंपनीच्या PXT टीमने यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेस्सी यांनी एआयमुळे नोकरकपात होणार असल्याचे सूचित केले आहे.