ब्रिटिश खासदाराने भारतीयांच्या वस्तीची केली झोपडपट्टीशी तुलना; ‘या’ विधानामुळे वाद!
ब्रिटिश खासदार रॉबर्ट जेनरिक यांनी बर्मिंगहॅममधील हँड्सवर्थ भागाबद्दल केलेल्या विधानावर ब्रिटनमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. त्यांनी या भागाला झोपडपट्टीसारखा म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. कन्झर्व्हेटिव्ह पक्षातील काही नेत्यांनी त्यांचे समर्थन केले, तर काही माजी नेत्यांनी टीका केली. बिशप ऑफ बर्मिंगहॅम मायकल वोलँड यांनीही जेनरिक यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 