पाकिस्तानने ताब्यात घेतलेले बीएसएफ जवान पुर्णम कुमार शॉ यांची सुटका
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा पार केल्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफचे जवान पूर्णम शॉ यांना ताब्यात घेतले होते. १४ मे रोजी त्यांना भारतात सोडण्यात आले.