लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचारीच निघाला लाचखोर; भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून घ्यायचा हप्ता
राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक जगराम मीणा यांना बेहिशेबी रोख रकमेसह पकडण्यात आले. शिवदासपुरा टोल प्लाझा येथे तपासणीदरम्यान त्यांच्या वाहनात ९.३५ लाख रुपये आढळले. त्यांच्या जयपूर निवासस्थानी ३९.५ लाखांची रोकड, जमीन, फ्लॅटचे कागदपत्रे आणि ८५ विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. मीणा यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे.