“या देशात…”, सरन्यायाधीशांवरील बूट हल्ल्यावर आई कमलताई गवई यांची पहिली प्रतिक्रिया!
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा देशभरात निषेध होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गवई यांच्या आई कमलताई गवई यांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सर्वांना शांततेने आणि संवैधानिक मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.