एस जयशंकर यांची ४८ वर्षांपूर्वीची मुलाखत, आणीबाणी आणि विचारलेला ‘तो’ प्रश्न!
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी २१ मार्च १९७७ रोजी, आणीबाणी हटवली गेल्याच दिवशी, UPSC मुलाखत दिली होती. दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी नव्याने UPSC उत्तीर्ण उमेदवारांशी संवाद साधला आणि १९७७ च्या निवडणूक निकालांबद्दल विचारलेल्या प्रश्नाची आठवण सांगितली. त्यांनी आणीबाणीविरोधात काम केल्याचेही नमूद केले.