संजय राऊत यांना गंभीर आजार; पंतप्रधान मोदींनी पोस्ट करत म्हटले, “प्रार्थना करतो की…”
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत, ज्यांना शिवसेना आणि मविआची मुलुख मैदान तोफ समजले जाते, ते दोन महिने आजारामुळे विश्रांती घेणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. राऊत यांनी मोदींचे आभार मानले.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 