रामदेव बाबांचे सहकारी बाळकृष्णांची ‘कमाल’, एका वर्षात उत्पन्न ८ पट; धक्कादायक..
आचार्य बाळकृष्ण यांच्या मालकीच्या कंपन्यांनी उत्तराखंडमधील जॉर्ज एव्हरेस्ट पार्कच्या कंत्राटात गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. मसुरीजवळच्या १४२ एकर जमिनीवर अॅडव्हेंचर टुरिझम विकसित करण्यासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या, ज्यात दोन कंपन्या बाळकृष्ण यांच्या होत्या. तिसरी कंपनीही नंतर त्यांच्या मालकीची झाली. या प्रकल्पामुळे राजस एरोस्पोर्ट्सचा नफा ८ पट वाढला. उत्तराखंड पर्यटन विभागाने सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा दावा केला आहे.