एच १ बी व्हिसासाठी ८८ लाख? डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांच्या अडचणी वाढणार
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणात बदल करत H-1B व्हिसासाठी शुल्क वाढवले आहे. आता कंपन्यांना प्रतीवर्षी १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. या निर्णयाचा फटका भारतीय आयटी कामगारांना बसू शकतो.