ट्रम्प यांच्या दादागिरीला राजनाथ सिंह यांचं सणसणीत उत्तर; म्हणाले, “सर्वांचे बॉस…”
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयातशुल्क लादल्याने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, भारताची प्रगती काहींना रुचत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अन्यायकारक टॅरिफ वाढ केली आहे. राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की, भारत आता अनेक वस्तू देशातच उत्पादित करून निर्यातही करत आहे.