“सरदार पटेल त्याचवेळी पीओके ताब्यात घेणार होते, पण…”, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी गांधीनगर येथे जाहीर सभेत ऑपरेशन सिंदूर आणि भारताच्या लष्करी कारवाईबद्दल माहिती दिली. त्यांनी सरदार पटेल यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाकव्याप्त जम्मू-काश्मीर ताब्यात घेण्याची संधी भारताने १९४७ साली गमावल्याचे सांगितले.