“सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकल्याच्या घटनेला उत्तर म्हणून आम्ही…”!
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या घटनेनंतर गुजरातमधील नवसर्जन संघटनेने ५००० बुटांचे जोड गरजू दलित विद्यार्थ्यांना वाटण्याचा निर्णय घेतला आहे. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, चंदीगढ व राजस्थानमधील विद्यार्थ्यांना हे बूट दिले जातील. या उपक्रमासाठी आरक्षणाचा लाभ घेतलेल्या व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.