मुस्लीम मुख्याध्यापकांना हटवण्यासाठी विद्यार्थ्याकरवी शाळेच्या टाकीत विषारी रसायन
कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात शाळेच्या मुस्लीम प्राध्यापकांना हटवण्यासाठी पाचवीच्या विद्यार्थ्याकरवी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी द्रव्य टाकल्याचा प्रकार घडला. या प्रकरणात श्रीराम सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. १२ विद्यार्थी आजारी पडले असून, सागर पाटील, नागनागौडा पाटील व कृष्णा मदार यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या धार्मिक द्वेषातून घडलेल्या कृत्याचा निषेध केला आहे.