प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी उपचारासाठी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल
काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रविवारी रात्री दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पोटाच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयातील गॅस्ट्रो विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.